राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली।
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥धृ o॥ महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने । आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥१॥ ... भुमीवर पडावे , ता-यांकडे पहावे । प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥ स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे । माझा हुकुम गाजे, या झोपडीत माझ्या॥३॥ महालापुढे शिपाई , शस्त्री सुसज्ज राही । दरकार तिही नाही, या झोपडीत माझ्या ॥४॥ जाता तया महाला, ' मत जाव ' शब्द आला । भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ॥५॥ महालात चोर गेले,चोरुनी द्रव्य नेले । ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ॥६॥ पहारे आणि तिजो-या, त्यातुनी होति चो-या । दारास नाही दो-या, या झोपडीत माझ्या ॥७॥ महालि सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । झोपेत रात्र जाई , या झोपडीत माझ्या ॥८॥ येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा। कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ॥९॥ चित्तास अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा । येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ॥१०॥ पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे । शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥११॥ वाडे, महाल, राणे केले अनंत ज्याने । तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ॥१२॥ ' तुकड्या ' मती स्फ़ुरावी, पायी तुझ्या रमावी । मुर्ती तुज़ी रहावी, या झोपडीत माझ्या ॥१३॥ | {राष्ट्रसंताची आरती }जय जय सतगुरु दीनदयाल दरससे हर्ष भयो .. लाखो जन्म कारे पुन जाके , तब पाए महाराज धन्य भये हम आज मिले तुम , सिद्ध भये सब काज..१.. ... टूट गयो अज्ञान अँधेरा , छायो बोध प्रकाश ... रूप तुम्हारा नजरमो भायो, पाप भये सब नाश..२.. ... किसविध महिमा गाऊ तुम्हारी बानी न पहुचे जाय. तन मन धनसे करू आरती,हिरदय बिच बसाय ..३.. चौदाभुवन प्रकाश तुम्हारा , ध्वजा खड़ी चाहुधाम . स्वर्ग मृत्यु पटल तिहु से, तुम्ही हो उपराम ..४.. ये तन थल नयन की बाती , तर सदा उजराय . तुकड्यादास दरस का भुखा ,यही पद हरदम पाय रचयिता --वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जय गुरु |